शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

Published on

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम महानगरपालिकेमार्फत सोमवारी (ता. ९) राबवण्यात आला. भिवंडी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना आणि सेवा सहज व सुलभपणे देण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. कोंबडपाडा येथील स्व. राजय्या गाजेंगी हॉल येथे उपआयुक्त (कर) दीपक झिंजाड व सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले.

या वेळी नागरिकांना महापालिकेच्या सेवासंदर्भातीत माहिती देण्यात आली. नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे, विविध दाखले वितरणासाठी ऊपलब्ध करून देण्यात आले. २०५ लाभार्थ्यांना उपआयुक्त (कर) दीपक झिंजाड व प्रणाली घोगे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व विविध दाखल्यांचे या वेळी वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपआयुक्त (कर) दीपक झिंजाड यांनी सांगितले, की भिवंडी महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी योजना व मनपाअंतर्गत सेवांचा लाभ अधिक गतीने देण्यासाठीचा हा प्रयत्न महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तमपणे केला आहे. त्यामुळे या योजना व सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता पुढे दर महिन्याला एकाच दिवशी प्रभाग समितीनिहाय शिबीर आयोजित करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.