डब्बा ट्रेडिंग रॅकेटप्रकरणी सहाव्या आरोपीस अटक

डब्बा ट्रेडिंग रॅकेटप्रकरणी सहाव्या आरोपीस अटक

Published on

अंधेरी, ता. ११ (बातमीदार) : स्टॉक एक्स्चेंजचा कुठलाही परवाना नसताना कोट्यवधी रुपयांचे शेअर खरेदी-विक्री करून (डब्बा ट्रेडिंग) सरकारचा दोन कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याच्या कटातील वॉण्टेड आरोपी उपेंद्र बाबूलाल सोनी याला गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १०) अटक केली. या अटकेने कटातील अटक आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात जतीन मेहता, धिमंत गांधी, विजय गडा, विजय राठोड आणि हितेश मकवाना आदींना पोलिसांनी अटक केली होती.

कांदिवली येथे काही शेअर ब्रोकर स्टॉक एक्स्चेंजचा कुठलाही परवाना न घेता ‘मुडी ॲप’च्या माध्यमातून ‘डब्बा ट्रेडिंग’ रॅकेट चालवत असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी २० जूनला पोलिसांच्या पथकाने जतीनच्या खासगी कार्यालयात छापा टाकला होता. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईलसह एक टॅब, एक लॅपटॉप, एक पेपर थ्रेडर, ५० हजार रुपये, एक राऊटर आणि एक पेनड्राईव्ह जप्त केला होता. यावेळी जतीन हा याच कार्यालयातून डब्बा ट्रेडिंग रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. त्याच्या चौकशीनंतर इतर चार सहकाऱ्‍यांना पोलिसांनी अटक केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.