संगीत रंगभूमीचा इतिहास ग्रंथरूपाने येणे आवश्यक

संगीत रंगभूमीचा इतिहास ग्रंथरूपाने येणे आवश्यक

Published on

मुंबई, ता. ११ : मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल कालखंडाचा इतिहास ग्रंथरूपाने येणे आवश्यक आहे. त्यामुळेच शब्द-स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा असणाऱ्या या मराठी संगीत रंगभूमीच्या तीन खंडांत प्रकाशित होणाऱ्या ग्रंथास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. येत्या वर्षभरात हा मोलाचा साहित्य दस्तावेज प्रकाशित होईल, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दर्शनिका (गॅझेटियर) विभागाच्या वतीने मराठी संगीत रंगभूमीच्या १७५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा ग्रंथ तीन खंडांत प्रकाशित केला जाणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्री मुनगंटीवार यांनी एका बैठकीत आढावा घेतला. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, ग्रंथ खंड निर्मिती समितीचे सदस्य डॉ. वंदना घांगुर्डे, संजय गोसावी, पं. शौनक अभिषेकी, सुलेखनकार अच्युत पालव आदींची उपस्थिती होते. तीन खंडांत हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार असून त्याची माहिती या वेळी डॉ. घांगुर्डे यांनी दिली.
...
संगीत रंगभूमीचा इतिहास जपणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल ही वैभवशाली इतिहासाचे पान आहे. त्यामुळे ती वाटचाल सध्याच्या पिढीसमोर येणे महत्त्वाचे आहे. कालबद्ध कार्यक्रम आखून त्या वेळेत तिन्ही खंड प्रकाशित होण्याच्या दृष्टीने संपादकीय मंडळातील सर्व समिती सदस्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक सहकार्य विभागाच्या वतीने करण्यात येईल.
- सुधीर मुनगंटीवार, मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.