४० कार आणि १८४ दुचाकींचा निर्भया पथकात समावेश

४० कार आणि १८४ दुचाकींचा निर्भया पथकात समावेश

Published on

मुंबई, ता. ११ : मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात नवीन ४० चारचाकी आणि १८४ दुचाकींचा समावेश करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ११) नरिमन पॉइंटमध्ये झालेल्या कार्यक्रमात निर्भया पथकासाठीच्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांसोबत पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मंत्री दीपक केसरकर, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर इत्यादींसोबत अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. नवीन वाहने मुंबई पोलिस दलात दाखल झाल्याने निर्भया पथक व बीट मार्शल अधिक सक्षम होणार आहे. मुंबई पोलिस दलातील सर्व वाहनांवर व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहनांचे मुख्य व प्रादेशिक नियंत्रण कक्षातून मॉनेटरिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने होणार आहे. नव्या वाहनांमुळे अधिक प्रभावीपणे गस्त घालून गुन्ह्यांना प्रतिबंध निर्माण होण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.