प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Published on

वासिंद, ता. १८ (बातमीदार) : मंथन पब्लिकेशन आयोजित केलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ता यादीत झळकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शहापुरातील म. ना. बरोरा विद्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता. १६) मोठ्या दिमाखात झाला. या सोहळ्यात तालुक्यातील मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झालेल्या २०४ विद्यार्थ्यांना आणि शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत झळकलेल्या दोन विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी गुणवत्ता वाढीसाठी शहापूर पॅटर्नच्या उपक्रमांचे कौतुक केले. सुधाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. हरिश्चंद्र भोईर यांनी आभारप्रदर्शन केले. रवींद्र भोईर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य भगवान जाधव, जनकल्याण पतसंस्थेचे सचिव रमेश वनारसे, आदिवासी उन्नती मंडळाचे समन्वयक रामचंद्र कशिवले, जनकल्याण विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय किरपण, नॉलेज ॲकॅडमीचे समन्वयक अरुण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, सेवानिवृत्त विस्ताराधिकारी वसंत वाघ आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.