दोन दुकानांचा सज्जा कोसळला

दोन दुकानांचा सज्जा कोसळला

Published on

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : पावसाने जोर धरला असल्याने छतांचे प्लास्टर पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील कांदा-बटाटा मार्केटच्या इमारतीमधील दोन गाळ्यांचा सज्जा पडण्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही; मात्र धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजारातील गाळे, प्रशासकीय इमारत तसेच मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत नवी मुंबई महापालिकेतर्फे २००५ पासून अतिधोकादायक करण्यात आली आहे. अत्यंत जर्जर अवस्थेतील या इमारतींचा पुनर्विकास व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वादात अडकला आहे. परिणामी, या इमारती अतिधोकादायक घोषित केल्यानंतर येथील व्यापाऱ्यांची पर्यायी व्यवस्था झाली नसल्याने व्यापारी जीव मुठीत धरून येथे व्यवसाय करत आहेत; तर इमारती धोकादायक असल्याने पावसाळ्यात छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी (ता. १७) रात्री गाळा क्रमांक एफ १२८ ते १३० या गाळ्यांसमोरील सज्जा व पत्रा शेड पडण्याची घटना घडली आहे. यात कोणीही जखमी झालेले नाही; मात्र एपीएमसीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.