सोडावाला शाळेला शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सोडावाला शाळेला शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Published on

कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये बोरिवली येथील एमपीएस सोडावाला लेन इंग्रजी शाळेला शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त झाले असून एकूण सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत सदर शाळेतील एकूण ९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६ विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी ४ विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
शाळेच्या मुख्यध्यापिका सूचना संखे, इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका तृप्ती संखे, इयत्ता आठवीच्या वर्गशिक्षिका शिला जो, शिष्यवृत्ती चा अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.