आचार्य अत्रे यांच्या जयंतीवर्षानिमित्त अग्रलेख स्पर्धा

आचार्य अत्रे यांच्या जयंतीवर्षानिमित्त अग्रलेख स्पर्धा

मुंबई, ता. १८ ः आचार्य अत्रे यांचे १२५ वे (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी) जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्‍पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे, अशी माहिती संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली आहे. सध्या चाललेला हा सर्वपक्षीय गोंधळ पाहिल्यास लोकशाहीची बूज राखण्यासाठी मतदारांवर मोठी जबाबदारी येणार आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीवर दूरगामी परिणाम करणाऱ्या या ‘तोडा-फोडा-मोडा-झोडा-राडा-आणि मग परत जोडा’ या प्रवृत्तीवर आचार्य अत्रे यांनी मराठामधून अग्रलेख कसा लिहिला असता. ‘सध्याची राजकीय परिस्थिती’ यावर ते कसे व्यक्त झाले असते हे लिहून पाठवावे लागणार आहे. या स्पर्धेची शब्दमर्यादा ६०० असून युनिकोड मराठी टायपिंग करून chalval१९४९@gmail.com यावर अथवा राजन देसाई ८७७९९८३३९० या मोबाईलवर ५ ऑगस्टपर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com