चिंचणी आरोग्य केंद्रासाठी सहा कोटींची मान्यता

चिंचणी आरोग्य केंद्रासाठी सहा कोटींची मान्यता

Published on

डहाणू, ता. २६ (बातमीदार) : चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी सहा कोटी रुपये खर्चासह कर्मचारी इमारत बांधण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील चिंचणीच्या पश्चिम किनारपट्टीवरील जनतेस आरोग्यविषयक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे.

चिंचणी प्राथमिक केंद्रात मंगळवारी (ता. २५) जनआरोग्य समितीची सभा घेण्यात आली. या सभेला जन आरोग्य समिती अध्यक्ष जयेंद्र दुबळा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, सदस्य भरत बाणे, सदस्य नारायण पाटील, सुरेंद्र राबड, डॉ. सुप्रिया केणी, डॉ. दर्शन खंडेझोड, डॉ. सुप्रिया चुरी आदी उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांच्या प्रयत्नाने चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी सहा कोटी रुपये खर्चासह कर्मचारी इमारत बांधण्यास मान्यता मिळाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांनी दिली.

डासांची उत्पत्ती रोखण्याचे निर्देश
पावसाळ्यात मलेरिया, डेंगीच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थानाचा शोध घेऊन ती नष्ट करावीत. परिसरातील रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय नळाद्वारे येणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटत असल्याने दूषित पाणी शिरून साथीचे रोग उद्भवत असल्याचेही आरोग्य समितीच्या बैठकीत सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.