प्रभात शाखेची वर्षा सहल उत्साहात

प्रभात शाखेची वर्षा सहल उत्साहात

Published on

कल्याण, ता. २६ (बातमीदार) : कल्याण पश्चिम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विवेकानंद प्रभात या शाखेची वर्षा सहल नुकतीच अंजूर फाटा गणपती मंदिर परिसर येथे झाली. दरवर्षी या सहलीचे आयोजन करण्यात येते.
या सहलीमध्ये सर्वांत प्रथम अंजुर येथे असलेल्या पेशवेकालीन सिद्धिविनायक गणपती मंदिराचे दर्शन घेतले. तसेच गणपतीची आरतीही करण्यात आली. या सहलीदरम्यान बौद्धिक वर्ग व ओळखसत्रही आयोजित करण्यात आले होते. या सहलीला मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते. या वेळी छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष स्वयंसेवक नारायण फडके यांनी मार्गदर्शन करून समारोप केला. या वेळी विवेकानंद प्रौढ शाखेचे कार्यवाह वसंत सहस्रबुद्धे, विवेकानंद प्रौढ शाखेचे माजी कार्यवाह शशिकांत जुवेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.