नूतनीकरण होऊनदेखील शौचालय बंद

नूतनीकरण होऊनदेखील शौचालय बंद

Published on

धारावी, ता. २६ (बातमीदार) : ढोरवाडा येथील नव्‍याने बांधण्यात आलेले शौचालय खुले केले नसल्‍याने रहिवाशांकडून संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी हे शौचालय तोडले होते. मात्र सध्या ते बंद असल्‍याने परिसरातील ज्‍येष्ठ नागरिकांबरोबर महिलावर्गाची गैरसोय होत आहे.‍
येथील चंदेरी मैदानाजवळील दुरवस्था झालेले बैठे शौचालय पालिकेतर्फे तोडून त्याजागी नवीन एकमजली शौचालय उभारण्यात आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी हे शौचालय तोडण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत नव्याने बांधण्यात आलेले शौचालय खुले केले नसल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शेकडो कुटुंबे या शौचालयाचा गेल्या अनेक वर्षांपासून वापर करत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शौचालय वापरता येत नसल्याने स्थानिकांना दुसऱ्या शौचालयाचा वापर करावा लागत आहे. मात्र दुसऱ्या विभागात शौचालयासाठी गेल्यानंतर तिथले रहिवासी विरोध करत असल्‍याचे रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. अनेकदा यावरून वादही झाले आहेत. नैसर्गिक विधी उरकण्यासाठी लहान मुले, वृद्ध, ज्‍येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर स्त्रिया यांना दूरवरील शौचालयात जावे लागत असल्याने त्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे नूतनीकरण झालेले शौचालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी येथील रहिवाशी करत आहेत.
....................................................
आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या शौचालयाचा वापर करत आहोत. घराजवळील शौचालय असल्याने रात्री-बेरात्री महिला-मुली निर्धास्तपणे शौचालयास जाऊ शकत होत्या. मात्र, सध्या शौचालय बंद असल्याने अडचणीत भर पडली आहे.
- आशा शिंदे, स्थानिक रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.