‘माणुसकीच्या भिंती’कडे निराधारांची पाठ

‘माणुसकीच्या भिंती’कडे निराधारांची पाठ

Published on

तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने ‘हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या’ अशी संकल्पना राबवली होती. त्यानुसार शहरातील मोक्याच्या ६८ ठिकाणी १६ खणांची कपाटे ठेवण्यात आली होती, पण या उपक्रमाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने हरताळ फासला गेला आहे.
पावसाळा सुरू असल्याने ‘माणुसकीच्या भिंती’मुळे परिसरातील नागरिकांवर नाक बंद करून चालण्याची वेळ आली आहे. कारण पदपथावरील या भिंतीजवळ भिजलेले जुने कपडे, तुटलेल्या खराब चपला, मुलांची खराब झालेली दप्तरे, अन्नपदार्थांची पाकिटे, फेकून दिलेला कचरा, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती ओढावल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. स्टँडमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य पावसाच्या पाण्याने भिजून गेल्याने गरजवंतांनी साहित्याकडे पाठ फिरवली आहे. तसेच भिजलेल्या साहित्यामुळे दुर्गंधीसह डासांचाही उपद्रव वाढला आहे. त्यामुळे माणुसकी जपणाऱ्या उपक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाल्याने काही महिन्यांपासून ‘माणुसकीची भिंती’वर अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे.
--------------------------------------------------
अडगळीच्या सामानासाठी वापर
भिजलेले सामान आठ-आठ दिवस तशाच पद्धतीने पडून राहते. त्यानंतर महापालिकेचे सफाई कामगार या वस्तू कचऱ्यात टाकून घेऊन जातात. शहरातील काही ठिकाणी तर बेशिस्त नागरिकांकडून घरातील अडगळीचे टाकाऊ सामानही टाकले जात आहे. त्यामुळे काही बेशिस्त नागरिकांमुळे पालिकेने निराधारांसाठी राबवलेल्या या उपक्रमालाच हरताळ फासला गेला आहे.
----------------------------------------
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी असे स्टॅंड लावले आहेत. सध्या पावसामुळे हे स्टँड अस्वच्छतेचे दर्शन घडवत आहेत. तसेच त्याची स्वच्छता महापालिका करत नाही.
- नीलेश बाणखिले, अध्यक्ष, उपशहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.