मणिपूर घटनेचा मनसेकडून निषेध

मणिपूर घटनेचा मनसेकडून निषेध

Published on

पालघर, ता. २६ (बातमीदार) : मणिपूरमधील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. मणिपूरमधील जीवघेणे अत्याचार थांबले पाहिजेत. तसेच मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. तसेच मणिपूरमधील निंदनीय घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्षा प्रिती मोरे, जिल्हा उपाध्यक्षा तथा सातपाटी सरपंच सीमा भोईर, उपतालुका अध्यक्षा सारिका मोरे, विभाग अध्यक्षा राजश्री ठाकूर, अश्विनी पाटील, हर्षदा म्हात्रे, तसेच जिल्हा सचिव दिनेश गवई, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश म्हात्रे, तालुका अध्यक्ष तथा केळवा सरपंच संदीप किणी, पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश उपचिटणीस सिद्धेश महाले, सातपाटी उपसरपंच अभिजित तरे, सातपाटी सदस्य रितेश पागधरे, नितीन पाटील, नांदगाव उपशाखा अध्यक्षा रश्मी नाईक इत्यादी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.