मणिपूर घटनेविरोधात जव्हारमध्ये ''रास्ता रोको''

मणिपूर घटनेविरोधात जव्हारमध्ये ''रास्ता रोको''

Published on

जव्हार, ता. २६ (बातमीदार) : गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर येथे जातीय हिंसा सुरू आहे. तसेच महिलांवर अत्याचार करण्यात आले होते, त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत, हा अमानवी प्रकार सहन होत नसल्याने तालुक्यातील आदिवासी समाजातर्फे बुधवारी सकाळी ११ वाजता जव्हार शहरातील बिरसा मुंडा क्रांतिकारी चौक येथे हजारो संख्येने एकत्र येऊन ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना, सर्व पक्षांनी एकत्रित येत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी जव्हार तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते भावना पवार, एकनाथ दरोडा, बळवंत गावित, तसेच आदिवासी समाजातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर व्यक्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे महिलांच्या न्यायासाठी महिलांची उपस्थितीही अधिक होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.