पिस्तूल विक्रीसाठी आलेला व्यक्ती अटकेत

पिस्तूल विक्रीसाठी आलेला व्यक्ती अटकेत

Published on

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : कोपरखैरणे एमआयडीसी भागात पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन आलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सोमवारी रात्री सापळा लावून अटक केली आहे. जहीर अली सुलेमान मंचेकर (वय ४४) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपीने सदरचे पिस्तूल व काडतूस कोठून व कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते, याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. एमआयडीसी भागात एका बारजवळ एक व्यक्ती पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे, आर. एम. तडवी व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री एमआयडीसी भागात सापळा रचत रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास जहीर अली सुलेमान मंचेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी आरोपीला अटक करून तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.