मध्य रेल्वेच्या आणखी १८ गणपती विशेष एक्स्प्रेस

मध्य रेल्वेच्या आणखी १८ गणपती विशेष एक्स्प्रेस

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई ते कुडाळ स्थानकांदरम्यान आणखी १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने कोकणासाठी २०८ आणि पश्चिम रेल्वेने ४० गणपती विशेष एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कोकणात धावणाऱ्या गणपती विशेष एक्स्प्रेसची संख्या २६६ वर पोहचली आहे.

ट्रेन क्र. ०११८५ विशेष एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. ट्रेन क्र. ०११८६ एक्स्प्रेस कुडाळहून १३ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मंगळवार, गुरुवार आणि रविवारी दुपारी १२.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या दोन्ही विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग आदी ठिकाणी थांबणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.