जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीला ऑक्टोबरचा मुहूर्त

जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीला ऑक्टोबरचा मुहूर्त

Published on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २६ : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसह अन्य एका इमारतीच्या करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये त्या अतिधोकादायक असल्याचे उघड झाले. त्यानंतर ही इमारत पाडून नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यास राज्य शासनाने मंजुरी देत प्रशासकीय खर्चास मान्यतादेखील देण्यात आली आहे. त्यानंतर आता नवीन प्रशासकीय इमारतीचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागकडे पाठविण्यात आले आहे. या अंदाजपत्रक मान्यता मिळताच टेंडर प्रक्रिया पार पडून, येत्या ऑक्टोबरमध्ये झेडपीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा नारळ फुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट जानेवारी २०१७ मध्ये केले होते. मे २०१७ मध्ये इमारत धोकादायक असल्यामुळे ती पाडण्यात यावी, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून सप्टेंबर २०१७ मध्ये नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी हाती घेताच, त्यांच्याकडून ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे इमारतीच्या ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. तब्बल सात वर्षांनी या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. तसेच नवीन प्रशासकीय इमारत उभी राहण्यासाठी ३ ते ४ वर्षांचा कालावधी लागणार असल्याने नूतनीकरण करण्यासाठी सर्व विभागांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे, जिल्हा परिषद तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन, स्थलांतरासाठी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून जागानिश्चिती झाल्यानंतर जिल्हा परिषद स्थलांतरण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, झेडपीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ऑगस्ट २०२२ ला ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे इमारतीच्या ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यानंतर आता यासंदर्भातील अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले आहे. या अंदाजपत्रकास मान्यता मिळताच टेंडर प्रक्रिया पार पडून, येत्या ऑक्टोबरमध्ये झेडपीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा नारळ फुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

..................
ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येतील.
- रूपाली सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

......................

असे आहे जिल्हा परिषद इमारत प्रकरण
९६५-५५ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेची मुख्य इमारत बांधण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारातील मुख्य इमारतीसह अन्य एका इमारतीला ५० वर्षाहून अधिक काळ झाल्याने या दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट जिल्हा परिषद प्रशासनाने जानेवारी २०१७ मध्ये केले होते. मे २०१७ मध्ये इमारत धोकादायक झाल्यामुळे त्याचे निर्लेखन करण्यात यावे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले.


--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.