ठाण्यात तासाभरात २३.६३ मि.मी पावसाची नोंद

ठाण्यात तासाभरात २३.६३ मि.मी पावसाची नोंद

Published on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २६ : ठाणे शहरात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरूच आहे. बुधवारी दुपारी साडेतीन ते साडेचार या एका तासात तब्बल २३.६३ मि.मी. पाऊस झाल्याने सखल भाग असलेल्या वंदना टॉकीज आणि मासुंदा तलाव परिसरातील गांधी उद्यान परिसरात पाणी साचले होते. शहरात गेल्या चोवीस तासांत, म्हणजे मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ९४.४८ मि.मी. पाऊस झाला आहे. याचदरम्यान एकूण २३ तक्रारी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षात नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये तीन झाडे, तर दोन आगीच्या अन्य अशा तक्रारींचा समावेश आहे. बुधवारी सकाळी साडेआठपासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत ३६.८३ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याचदिवशी एक हजार ४४३.९७ मिमी पाऊस झाला होता, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. दरम्यान, बुधवारी कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने या ठिकाणाहून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी दुचाकी बंद पडण्याच्या घटना घडल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.