पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रविवारी (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास ओडीसी बोगद्याच्या मागे दरड कोसळल्याची घटना घडली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दुसऱ्या दिवशी (ता. २४) तीन तासांचा ब्लॉक घेऊन तातडीने दरड हटवली. त्यानंतरही या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका उद्या (ता. २७) दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. येथील धोकादायक दरडी हटवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान चार चाकी हलक्या वाहनांना शिंग्रोबा घाटातील जुना पुणे-मुंबई महामार्ग सुरू राहणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत दोन तास अवजड वाहनांना घाटात प्रवेशबंदी करण्यात येणार असल्याचे बोरघाट महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक निरीक्षक योगेश भोसले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.