मुंब्य्रात अमली पदार्थ तस्कराला अटक

मुंब्य्रात अमली पदार्थ तस्कराला अटक

Published on

कळवा, ता. २६ (बातमीदार) : मुंब्रा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुंब्य्रात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला मुंब्रा पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास अटक केली. मुंब्रा पोलिसांना आरोपी जस्टिस घनाईन (वय ४३, रा. खारघर) हा मोफेडोन हे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचत आरोपीला मुंब्रा पुलाखाली ताब्यात घेतले. यावेळी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५५ ग्रॅम अमली पदार्थ आढळले. यावेळी पोलिसांनी अमली पदार्थांसह आरोपीची दुचाकी जप्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.