दिघा येथील खांडी तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

दिघा येथील खांडी तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

Published on

नवी मुंबई (वार्ताहर): दिघा येथील खांडी तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अजय गुफ्ता (वय १९) या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तलावात बुडालेल्या अजयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिघा येथील खांडी तलावात बुडालेला अजय गुफ्ता हा तरुण दिघा येथील यादव नगर भागात राहण्यास असून तो बुधवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत दिघा येथील खांडी तलावात पोहोण्यासाठी गेला होता. या तलावात अजय पोहोण्यासाठी उतरला मात्र त्याला पोहता येत नसल्याने तसेच तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. यावेळी अजयच्या मित्रांनी आपल्या घरच्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी तलावावर धाव घेतली. त्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अग्निशमन दलासह तलावात बुडालेल्या अजयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्या हाती लागला नाही. अंधार झाल्याने अग्निशमन दलाने शोध मोहिम थांबविली असून सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राहुल गरड यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.