विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

ठाणे, ता. ३१ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि ठाणे शहर आयुक्त कार्यालय आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या सेल्फ फायनान्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोशल मीडिया नेटवर्क हॅकिंग आणि सायबर धोके’ या विषयावर जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सोशल मीडिया नेटवर्क विविध प्रकारच्या सायबर धोक्यांपासून असुरक्षित आहेत. चिंतेची बाब म्हणजे हॅकर सोशल मीडिया नेटवर्कचे वापरकर्त्याच्या माहिती आणि संमतीशिवाय खाते किंवा इतर डेटामध्ये प्रवेश मिळवतात. यात वापरकर्त्याला मालवेअर लिंक्स असलेला संदेश पाठवला जातो किंवा संगणक प्रोग्राम वापरून हॅकर पासवर्ड मिळवात. या प्रकारचे हल्ले कसे रोखवेत, याची माहिती पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रमुख वक्ते दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. विनयकुमार राठोड, ज्ञानसाधना संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, सहसचिव मानसी प्रधान, कोषाध्यक्ष सतीश शेठ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश भगुरे, सेल्फ फायनान्स विभागाचे उपप्राचार्य सुयश प्रधान, त्याबरोबरच प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन
अनेक लोक वाहन चालवताना मोबाईलचा वापर करतात, जे सुरक्षित नाही, यावर पोलिस सहआयुक्त कराळे यांनी आपली नाराजी व्यक्त करून विद्यार्थ्यांना नियमाचे पालन करण्यास आवहन उपस्थितांना केले. त्याचबरोबर वाहन चालवताना कोणती सावधगिरी बाळगण्याची गरज आहे हे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com