बांधकाम कामगारांचा आझाद मैदानावर मोर्चा

बांधकाम कामगारांचा आझाद मैदानावर मोर्चा

भिवंडी,ता. ३१ (बातमीदार) : बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेने परिपत्रकाद्वारे दिली. शासनाने बांधकाम कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला कामगार कल्याणकारी मंडळावर नियुक्ती करावी, बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेसाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी १० हजार रुपये बोनस द्यावा, मयत बांधकाम कामगाराची वयोमर्यादा न पाहता त्याच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक सहाय्य द्यावे,अशा विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीने महामोर्चाचे आयोजन केले आहे, अशी माहिती समितीकडून देण्यात आली.
…..
गळफास घेऊन विवाहतेची आत्महत्या
खर्डी (बातमीदार) : खर्डी येथील आनंदनगर येथील सिद्धी राजन जाधव (२२) या विवाहितेने आपल्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. व्यवसायाने विकासक असलेले राजन जाधव हे दुपारी घरी आले असता त्यांना सिद्धीने गळफास घेतलेला दिसल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. दरम्यान माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये व माझ्या मुलीला कोणापासून तोडू नये असे लिहिलेली चिट्ठी पोलिसांना घटनास्थळी आढळली आहे. या प्रकरणी सिद्धीची आई सारिका गायकवाड(पनवेल) यांनी पती राजन व सासरची मंडळी मुलीकडे वारंवार हुंड्याची मागणी करून मानसिक छळ करत होती त्यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा राजन जाधव, सासू व नणंद यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपी फरार असल्याचे असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले.
…..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com