मासवण-नागझरी रस्त्याचे ऑक्टोबरमध्ये नूतनीकरण

मासवण-नागझरी रस्त्याचे ऑक्टोबरमध्ये नूतनीकरण

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : मासवण-नागझरी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रवासादरम्यान यातना सोसाव्या लागत आहेत. या रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत आमदार राजेश पाटील यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करून ऑक्टोबरमध्ये नूतनीकरण करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिल्या.

मासवण वांदिवली काटाळे, लोवरे, नीहे, नागझरी या गावांसह अनेक छोटे-मोठे पाडे या मार्गाच्या आसपास आहेत. त्या रस्ताच्या दुरवस्थेमुळे स्थानिकांचा राग आता उफाळून आला आहे. प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी तरुणांनी मासवण-नागझरी रस्ता संघर्ष समिती स्थापना केली आहे. आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम कंत्राटदारांनी अर्धवट आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा संबंधित अधिकारी वर्गाच्या ही बाब लक्षात आणून दिली, मात्र त्यांनीही दुर्लक्ष केल्याने रस्त्याची ही स्थिती झाल्याने ग्रामस्थांनी समितीची स्थापना केली आहे.

मासवण-नागझरी या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात २१ जुलै रोजी ‘सकाळ’मध्ये ‘रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची आमदार राजेश पाटील यांनी दखल घेतली आहे. त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना रस्त्याबाबत माहिती दिली. कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा रस्त्याची भयावह स्थिती विशद केल्यावर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता रस्ता तत्काळ दुरुस्तीसह नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव त्यांनी आढावा बैठकीत मांडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com