विजेचा अवेळी खेळखंडोबा

विजेचा अवेळी खेळखंडोबा

उरण, ता.३१(बातमीदार)ः उरण पूर्व विभाग परिसरात मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरू असल्याने उरण परिसरातील नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे कित्येक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होत असल्याने दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम झाला आहे.
उरण पूर्व विभागातील रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच पावसामुळे परिसरात गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रात्री झोप होत झाल्यामुळे दैनंदिन दिनचर्येवर परिमाण झाला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मंगळवारी उरण शहरातील विद्युत पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खंडित केला जातो. तरी देखील अनियमित वीजपुरवठामुळे उरण पूर्व विभागात अनेकांना विजेच्या उपकरणांचा आधार घ्यावा लागत आहे. तर वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन देखील भरमसाठ देयके येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे.
----------------------------------
नेटवर्क नसल्याने संपर्काबाहेर
अवेळी जाणाऱ्या वीज समस्येमुळे अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज सारखी महागडी विद्युत उपकरणे खराब होत आहेत. याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेल्या दूध भाज्या देखील खराब होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच वीज नसल्यामुळे पूर्व विभागात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने संपर्क करणे, ही कठीण झाले आहे. मात्र, वीज समस्येमुळे इंटरनेटची सेवा देखील बंद होत आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
-----------------------------
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे खराब होत आहेत. त्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न, भाज्या, दूध खराब होत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे.
-कल्पना पाटील, गृहिणी, उरण
-------------------------------------
उरण रेल्वे प्रकल्पासाठी विजेचा अधिक लोड घेतला जात आहे. त्यामुळे लाईन ट्रीप होत असल्याने वांरवार वीज समस्या निर्माण होत आहेत.
- प्रथमेश मयेकर, उप-अभियंता, महावितरण पूर्व विभाग, उरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com