खाडीतील गाळामुळे मच्छीमारांच्या बोटी अडकल्या

खाडीतील गाळामुळे मच्छीमारांच्या बोटी अडकल्या

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा कालावधी सोमवार (ता. ३१) पासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. १) मासेमारीला पुन्हा सुरुवात होणार आहे. सातपाटी मच्छीमार बंदरातील खाडीमध्ये बोटींच्या मार्गात गाळ साचला आहे. त्यामुळे समुद्रात मच्छीमारीसाठी कसे जायचे असा मोठा प्रश्न मच्छीमारांपुढे निर्माण झाला आहे. खाडीत साचलेला गाळ तातडीने काढण्यासाठी कमीतकमी रॉयल्टी आकारून हा गाळ काढण्यासाठी परवानगी मिळावी अथवा जिल्हा नियोजन निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे साकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सातपाटी मच्छीमारांनी घातले आहे
सातपाटी खाडीमध्ये मच्छीमार बोटी येण्या-जाण्याच्या मार्गात व मत्स्य बंदरातील जेट्टीसभोवती मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. मोठ्या भरतीच्या वेळी विशिष्ट वेळेतच बोटी खाडीत, तसेच जेटीवर पोहचू शकतात. इतर वेळी बोटी गाळात अडकल्यास मच्छीमारांना मासे व मच्छीमारी साहित्यांची ने आण गाळातून करावी लागते. तसेच मोठी भरती येईपर्यंत थांबावे लागते. मासेमारीचे दिवस वाया गेल्याने आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या पावसाळी वादळी हवामानात बोट जेट्टीला लागत नसल्याने रात्री अपरात्री कितीही वादळ वारा, पाऊस असला तरी पर्याय नसल्याने जीव धोक्यात घालून भर समुद्रात पाच ते सात नॉटिकल अंतरावर बोटी नांगरून ठेवाव्या लागतात. या परिस्थितीमुळे मच्छीमारांना आर्थिक आणि काही वेळेस जीवितहानीला समोर जावे लागत आहे.

-------------
सातपाटी मच्छीमार बंदरात दरवर्षी खाडीमध्ये गाळ साचून मच्छीमार बोटी जाण्यासाठी मार्ग बंद होतो. आतापर्यंत सातपाटीमधील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्था खर्च करून गाळ काढत होत्या. मात्र आता गाळाचे प्रमाण जास्त वाढले आहे. शासनाने रॉयल्टी कमी करून गाळ काढण्यास परवानगी द्यावी अन्यथा जिल्हा नियोजनमधून खर्च करून गाळ काढावा. शासनाने तसे परिपत्रक काढलेले आहे. शासनाचे लक्ष वेधावे यासाठी आम्ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
- राजन मेहर, अध्यक्ष सातपाटी मच्छीमार सहकारी संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com