आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

जव्हार, ता. ३१ (बातमीदार) : शासकीय योजनांकरता आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले आणि इतर महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मंगळवार (ता. १) पासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जव्हारच्या तहसीलदार लता धोत्रे यांनी केले आहे. महसूल विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, त्याची सामाजिक उपयुक्तता या कामाबद्दल सामान्य नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी संपूर्ण जिल्हाभर महसूल विभागांतर्गत १ ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह राबवण्यात येणार आहे. आठवडाभर जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ‘युवा संवाद’, ‘एक हात मदतीचा’, ‘जनसंवाद’, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’, ‘महसूल संवर्गातील
कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद’ आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com