महात्मा गांधींबाबत केलेले वक्तव्य दुर्देवी

महात्मा गांधींबाबत केलेले वक्तव्य दुर्देवी

Published on

उल्हासनगर, ता. ३१ (वार्ताहर) : आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या शोकसभा कार्यक्रमात उल्हासनगरात आलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. महात्मा गांधी हे देश-विदेशातील आदरणीय व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून त्यांच्या वयाला अशा प्रकारचे वक्तव्य शोभत नाही, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. कॅम्प नंबर ४ मधील कुर्ला कॅम्प परिसरात माजी शिक्षण अधिकारी व आंबेडकरी चळवळीचे नेते दिवंगत डी. डी. खरे यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोमवारी (ता. ३१) उल्हासनगरात आले होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी ही टीका केली. या वेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, वरिष्ठ नेते अण्णा रोकडे, प्रा. विठ्ठल शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, माजी गटनेत्या अंजली साळवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com