कोकण विभागात आजपासून महसूल सप्ताह

कोकण विभागात आजपासून महसूल सप्ताह

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना शासकीय योजनांकरता आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले आणि इतर महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १ ते ७ ऑगस्ट या काळात महसूल सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. कोकण विभागात मोठ्या प्रमाणावर हा सप्ताह साजरा करण्यात यावा यासाठी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सोमवारी (ता. ३१) जिल्हाधिऱ्यांशी संवाद साधला.
महसूल सप्ताहामध्ये कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यात सात-बाऱ्यावर महिलांचे नाव लावण्यात यावे यासाठी पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत आत्तापर्यंत एक लाख २५ हजार कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. या सप्ताहात उर्वरित सर्व लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात यावे, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, युवासंवाद कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रांवर कार्यक्रम घ्यावेत. प्रत्येक तालुक्यात महसूल दूत नेमण्यात यावे. याशिवाय मुख्यमंत्री संदर्भ पत्र हातावेगळे करण्यात यावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला कोकण विभागातील रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेदर सिंह, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, तहसीलदार माधुरी डोंगरे यांच्यासह इतर अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com