कोणतेही प्रतिकूल मतप्रदर्शन नाही

कोणतेही प्रतिकूल मतप्रदर्शन नाही

मुंबई, ता. ३१ : कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत किंवा कोटक बँकेचा, त्यांच्याच दोन विमा उपकंपन्यांमध्ये असलेल्या वाट्याबाबत रिझर्व्ह बँकेने कोटक बँकेला काहीही कळवले नसल्याचा दावा बँकेतर्फे करण्यात आला आहे.

यासंदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये (सकाळ नव्हे) प्रसिद्ध झालेल्या वृत्तात रिझर्व्ह बँकेने कोटक बँकेवर दडपण आणल्याचा दावा करण्यात आला होता. उदय कोटक यांच्या जागी कोण उत्तराधिकारी नेमावा, याबाबत रिझर्व्ह बँक कोटक बँकेवर दडपण आणत आहे. रिझर्व्ह बँकेने कोटक बँकेच्या संचालक मंडळाला आपले मत कळवले आहे. तसेच कोटक बँकेच्या दोन विमा उपकंपन्यांमधील वाट्यामुळे कोटक बँकेच्या स्थैर्यावर परिणाम होत आहे का, याबाबतही रिझर्व्ह बँक तपासणी करत आहे, अशी अर्थक्षेत्रात चर्चा असल्याचेही या बातमीत म्हटले होते. मात्र सीईओ उदय कोटक यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत रिझर्व्ह बँकेने कोटक बँकेला औपचारिकरित्या वा अनौपचारिकरित्या काहीही कळवले नाही. आपल्याच दोन विमा कंपन्यांमधील वाट्याबाबतही कोटक बँकेने यापूर्वी रिझर्व्ह बँकेसह अन्य सर्व नियमांची पूर्वपरवानगी घेतली आहे. त्याबद्दलही आम्हाला कोणीही काहीही कळवले नाही, अशी माहिती कोटक बँकेच्या प्रवक्त्याने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com