पाली हिल येथे १०३ कोटींना तीन सदनिका

पाली हिल येथे १०३ कोटींना तीन सदनिका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक दिनेश विजन यांनी पाली हिल, वांद्रे येथे बांधकाम सुरू असलेल्या गगनचुंबी इमारतीत तब्बल १०३ कोटी रुपयांना तीन अपार्टमेंट बुक केले आहेत. मुंबईतील नर्गिस दत्त रोड येथे रुस्तमजी या विकसकाने हाती घेतलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून एका गगनचुंबी इमारतीचे काम सुरू आहे. परिश्रम गृहनिर्माण संस्था ही पाली हिलमधील अनेक जुन्या इमारतींपैकी एक आहे, ज्याचा पुनर्विकास अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट ब्लॉकमध्ये केला जात आहे.

इंडेक्स टॅप डॉटकॉमच्या महितीनुसार, या घराच्या व्यवहाराची नोंदणी २५ जुलै रोजी झाली आणि खरेदीदाराने ६.२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. ९,००० स्क्वेअर फुटांच्या तीन अपार्टमेंट्सच्या (७,७९१ स्क्वेअर फूट कार्पेट) क्षेत्रात याचे बांधकाम सुरू आहे. पश्चिम उपनगरात प्रथमच असा करार झाला आहे. यापूर्वी चित्रपट उद्योगातील लोकांचा समावेश असलेल्या अनेक मालमत्ता व्यवहारांमध्ये जून महिन्यात अभिनेता कार्तिक आर्यनने जुहूमध्ये १,९१६ चौरस फुटांचे घर १७.५ कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या वर्षी अभिनेता रणवीर सिंगने वांद्रे बँडस्टँड येथे ‘समुद्राभिमुख’ हे ११९ कोटी रुपयांचे घर विकत घेतले.

मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट हे बॉलीवूड दिग्गजांना लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी नेहमीच सुरक्षित राहिले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपट दिग्दर्शक राज कपूरच्या कायदेशीर वारसांनी चेंबूरमधील त्याच्या एक एकर बंगल्याचा १०० कोटी रुपयांमध्ये लिलाव केला. ही मालमत्ता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली. त्यावेळी कपूर यांच्या मालकीचे आर. के. स्टुडिओदेखील खरेदी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com