‘इंद्रधनुष्य’चे ५२२ बालकांना संरक्षण

‘इंद्रधनुष्य’चे ५२२ बालकांना संरक्षण
Published on

पनवेल, ता. ८ (बातमीदार) : गोवर रुबेला आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबवण्याचे निश्‍चित केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवार (ता. ७) पासून या मोहिमेचा शुभारंभ झाला असून एका दिवसात ५२२ बालकांचे तसेच ८९ गरोदर मातांचेही लसीकरण झाले आहे.
महापालिका क्षेत्रात लसीकरणासाठी महापालिकेच्या वतीने नेहमीच जनजागृती केली. मुलांचे आरोग्य सुदृढ बनवायचे असेल, बालकांच्या पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. त्यामुले पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके तसेच गर्भवती महिला लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य ५.० राबवण्यात येत आहे. या मोहिमेतील पहिली फेरी पीर करीम अली शाह उर्दू शाळेमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांनी व गर्भवती महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. या वेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक मुकित काझी, डॉ. सुरेखा मोहकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. नेहा म्हात्रे, परिचारिका, आशा वर्कर्स, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------
मिशन इंद्रधनुष्य ५.० अंतर्गत पालिका क्षेत्रातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही. तळागाळापर्यंत हा लसीकरणाचा कार्यक्रम पोचवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे. बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण प्रभावी साधन आहे.
- डॅा. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com