

''दरवळ : मराठी साहित्य संस्थांचा’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, ता. १७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच सचिन तळे लिखित ‘दरवळ : मराठी साहित्य संस्थांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले.
मराठीसाठी काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रासह देशभर कार्यरत असलेल्या ५० मराठी संस्थांची आणि चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या १०० मराठी साहित्य संमेलनांची माहिती या पुस्तकात आहे. यावेळी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, सभापती नीलम गोऱ्हे, लेखक सचिन तळे, दीप्ती तळे आणि ‘वल्लरी प्रकाशन’चे प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी पुस्तकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.