

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : पाकिस्तान ते उल्हासनगर अशा प्रवासात गेल्या १२५ वर्षांपासून सतत तेवत राहणारी उल्हासनगरातील चालिया मंदिरातील ज्योतीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. मंदिरातील भव्य सोहळ्यात रेकॉर्ड टीमचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्या आले आहे.
ज्योतीची अखंडपणे तेवत राहण्याची माहिती गंगोत्री फाऊंडेशनचे भारत गंगोत्री, सोनिया धामी यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठवली होती. रेकॉर्ड टीमने या ज्योतीची रेकॉर्डमध्ये नोंद केल्यावर १७ ऑगस्ट रोजी टीमचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. या वेळी आमदार कुमार आयलानी, गंगोत्री फाऊंडेशनचे भारत गंगोत्री, सोनिया धामी, सुनीता बगाडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी, सामाजिक कार्यकर्ते काजल मूलचंदानी, शशिकांत दायमा आदी उपस्थित होते. शिवाय इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड यांनीही सतत तेवत राहणाऱ्या ज्योतीचे कौतूक करून तसे पत्र पाठवले आहे. या पवित्र ज्योतीची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भारत गंगोत्री, सोनिया धामी यांनी दिली.
----------
फाळणीनंतर ज्योत भारतात
अखंड भारत असताना पाकिस्तानातील सिंध प्रांतात असणाऱ्या पिरघोट शहरामधील चालिया मंदिरात ही ज्योत ५० वर्षे तेवत होती. १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यावर तेथील सिंधी बांधवांना उल्हासनगरात आश्रय देण्यात आला. तेव्हा तेथील सिंधी बांधवांनी पिरघोटमधील ही ज्योत तेवत ठेवत उल्हासनगरात आणली होती. ७५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या चालिया मंदिरात या ज्योतीला स्थापित करण्यात आले होते. तेव्हापासून ही ज्योत विझू देण्यात आली नसून पाकिस्तान ते उल्हासनगर अशा १२५ वर्षांपासूनच्या प्रवासात ही ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.