

नेरळ, ता. १८ (बातमीदार) : राज्यात राजकीय विश्वात मोठी उलथापालथ होत असून त्याचा परिणाम कर्जत तालुक्यातदेखील पाहायला मिळत आहे. कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी खारीक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. कर्जत-खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आता संपूर्ण ताकदीनिशी उतरला असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले तसेच शेलू ग्रामपंचायत सरपंच शिवाजी खारीक यांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तसेच अनेकांची विविध पदी नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. यामध्ये कर्जत शहर कार्याध्यक्षपदी राजाभाऊ कोठारी, उपाध्यक्षपदी उमेश गायकवाड, अल्पसंख्याक सेल रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी आयुब तांबोळी, कर्जत तालुका उपाध्यक्षपदी समीर देशमुख, कर्जत तालुका उपाध्यक्षपदी शिवाजी खारीक, युवक राष्ट्रवादी काँगेस रायगड जिल्हा सरचिटणीसपदी शहनवाज पानसरे, कर्जत-खालापूर विधानसभा उपाध्यक्षपदी अविनाश कडू, युवक राष्ट्रवादी काँगेस कर्जत खालापूर विधानसभा उपाध्यक्षपदी नितीन गायकर, कर्जत तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्षपदी सर्फराज टिवाळे, रायगड जिल्हा डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. फिजा आयुब तांबोळी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.