

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २०) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
...
मध्य रेल्वे
कुठे ः माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी ः सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
...
हार्बर रेल्वे
कुठे ः कुर्ला- वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी ः सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉक कालावधीत वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकतील.
...
पश्चिम रेल्वे
कुठे ः बोरिवली-भाईंदर अप-डाऊन धीम्या, डाऊन जलद मार्गावर
वेळ ः शनिवार-रविवारमधील रात्री १२.४० ते रविवारी पहाटे ४.४० वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या विरार-वसई रोड ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील आणि सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवसाचा ब्लॉक असणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.