महाराष्ट्राला मिळणार दमदार वक्ते, रिल्स स्टार

महाराष्ट्राला मिळणार दमदार वक्ते, रिल्स स्टार

Published on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १८ : ‘डेव्हलपमेंट फाऊंडेशन फॉर महाराष्ट्र’ संस्थेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या ‘समन्वय प्रतिष्ठान’तर्फे ठाणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी २८ ऑगस्टला डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्राचा दमदार लेखक’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, ‘महाराष्ट्राचा दमदार वक्ता’ या विषयावर राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय ऑफलाईन वक्तृत्व स्पर्धा, ‘महाराष्ट्राचा मीमर’ या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मीम स्पर्धा, ‘महाराष्ट्राचा रिल्सस्टार’ ही ऑनलाईन रिल्स स्पर्धा होणार आहे. ‘विश्वगुरू भारत’, ‘महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील खरा पैलवान’, ‘महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय स्थिरता’, ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी जलनीती’, ‘व्हिजन महाराष्ट्राच्या विकासाचे’ आदी विषय निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला ५१ हजार रुपये, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार आणि १० उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची बक्षिसे आणि जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाला ११ हजार रुपये, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार आणि १० उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतील, असे भाजपच्या शैक्षणिक प्रकोष्टचे संयोजक सचिन बी. मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com