

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः ॲपबेस खासगी प्रवासी वाहतूक सेवांपेक्षा स्वस्त असलेल्या, ‘बेस्ट’च्या वातानुकूलित लक्झरी प्रीमियम बसना प्रवाशांनी पसंती दिली आहे. ठाणे-बीकेसी, एअर पोर्ट ते खारघर अशा अनेक बस मार्गांवर धावणाऱ्या प्रीमियम बसमधून रोज तीन हजार ६०० हून अधिक प्रवासी प्रवास करत असून प्रवाशांच्या माध्यमातून बेस्टच्या तिजोरीत दिवसाला तीन लाख ५० हजार महसूल जमा होत असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत इलेक्ट्रिक वातानुकूलित प्रीमियम बस आणल्या आहेत. १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या प्रीमियम बसने रोज साडेतीन हजारांहून अधिक प्रवासी लक्झरी प्रवास करत आहेत. ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी, मुंबई विमानतळ ते खारघर, विमानतळ ते कुलाबा, ठाणे ते पवई (हिरानंदानी) दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू आहे. प्रवाशांची पसंती लक्षात घेता भविष्यात आणखी नवीन बस मार्गावर या लक्झरी बस चालवण्यात येतील, असे बेस्टकडून सांगण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे, पूश बॅक सीट, सीटसमोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलन अशी या बेस्ट बसची वैशिष्ट्ये आहेत.
...
उभ्याने प्रवासास बंदी
बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीवर भर दिला असून चलो ॲपवर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य दिले जाते; परंतु प्रीमियम लक्झरी बसने प्रवास करण्यासाठी आधी चलो ॲपवर तिकीट बुकिंग करणे गरजेचे आहे. तसेच या बसमध्ये उभ्याने प्रवासास बंदी असल्याने प्रवाशांना आधी तिकीट बुकिंग करणे गरजेचे आहे. प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी बस कुठपर्यंत आली, बसमध्ये सीट आहे की नाही, किती वेळात बस इच्छितस्थळी पोहोचणार ही माहिती प्रवाशांना मोबाईलवर उपलब्ध होत आहे.
...
सध्या या मार्गांवर सेवा
एस १०१ ठाणे-बीकेसी
एस १०२ वांद्रे-बीकेसी
एस १०४ विमानतळ ते कफ परेड
एस १०५ विमानतळ-खारघर
एस १०६ विमानतळ-ठाणे
एस १११ ठाणे-अंधेरी
एस ११२ गुंदवली-बीकेसी
११४ खारघर-बीकेसी
एस ११५ बेलापूर-बीकेसी
एस १२२ विमानतळ ते गुंदवली
एस १२३ विमानतळ ते गुंदवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.