रस्त्यावर विष्ठा करणाऱ्या श्‍वानाच्या मालकाला दंड

रस्त्यावर विष्ठा करणाऱ्या श्‍वानाच्या मालकाला दंड
Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ ः रस्ते व सार्वजनिक ठिकाणी विष्ठा उत्सर्जन करणाऱ्या पाळीव श्वानांच्या मालकांवर तीव्र कारवाई केली जाणार आहे. संबंधित मालकांनी आपल्या श्वानांच्या विष्ठेची विल्हेवाट लावली नाही तर पालिका मालकांकड़ून ५०० रुपये दंड वसूल करणार आहे.

मुंबईच्या सुशोभीकरणावर महापालिकेकडून १७०० कोटी रुपये खर्च केला जात आहे. फूटपाथ, दुभाजक, समुद्रकिनारे, उद्याने, भिंती, हेरिटेज वास्तू यांचे सुशोभीकरण केले जात आहे. पालिकेने शहरातील स्वच्छतेवर भर दिला आहे. पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला आणताना मालकांकडून श्वानांच्या मलविसर्जनाची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे शहर अस्वच्छ होते. यापुढे अशी घाण करणाऱ्या श्‍वानांच्या मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर अनेक श्वान मालक किंवा ‘केअर टेकर’ हे आपल्या घरातील पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येत असतात. अशावेळी अनेकदा रस्त्यांवर, पदपथांवर वा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा उत्सर्जन करतात. शहर स्वच्छ राहण्याच्यादृष्टीने पालिकेने याकडे लक्ष पुरवले आहे. मालकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या विष्ठेची विल्हेवाट लावलीच पाहिजे. श्वानांची विष्ठा उचलता येईल अशा काठीसारख्या उपकरणाचा वापर करण्याचेही पालिकेने सुचवले आहे. या उपकरणाद्वारे विष्ठा सहजरित्या फेकता येईल, असे हे उपकरण असणार आहे. हे उपकरण पाचशे रुपयांत दुकानात उपलब्ध असल्याचे पालिकेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com