

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : उलवे येथे बेकायदा वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी (ता. १७) सायंकाळी छापा मारून अटक केली. या कारवाईत पाच पुरुष व तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक बांधकाम साईटवर मजुरी करून, तसेच घरकाम करून मागील आठ महिन्यांपासून उलवे भागात राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. उलव्यातील सेक्टर- १७ मधील ‘साई यश’ इमारतीमध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी बांगलादेशी नागरिकांना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ‘साई यश’ इमारतीमधील घरांवर छापा मारला. या वेळी कोना नवाब शेख (वय ३२), रानी चांदू शेख (वय २०), बिस्टी नोयन शेख (वय २०), शावन अजहार हलदर (मुसा) (वय ३९), नोयन मोहसीन शेख (वय २३), मोहम्मद हेदरअली शेख (वय २६), साजन अजहार हलदर (वय ३९) व मोहसीन अब्दुल रहिमान शेख (वय ६४) हे त्याठिकाणी बेकायदा वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.