

नवी दिल्ली (पीटीआय) : आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुडीजने शुक्रवारी भारताचे सार्वभौम पतमानांकन ‘बीएए३’ हे स्थिर दृष्टिकोनासह कायम ठेवले आहे. तसेच उच्च विकासदरामुळे हळूहळू उत्पन्नवाढीचा स्तर उंचावेल. त्याचा पुढे जाऊन आर्थिक क्षमता अधिक भक्कम होण्यास मदत होईल. येत्या दोन वर्षांत भारताचा विकास दर सर्व ‘जी २०’ अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त राहील. यात देशांतर्गत मागणीचा वाटा सर्वाधिक राहील, असा अंदाज मुडीजने वर्तवला आहे.
बीएए३ हे सर्वात कमी गुंतवणूक मानांकन आहे. फिच, एस अँड पी आणि मुडीज या तिन्ही संस्थांनी भारताला ‘बीएए३’ हे स्थिर पतमानांकन बहाल केले आहे. गेल्या सात ते दहा वर्षांत भारताचा विकासदर हा क्षमतेपेक्षा कमी राहिला असला तरी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास सुरूच राहील, असेही मुडीजने स्पष्ट केले आहे.
‘जीडीपीचा वेगाने होणाऱ्या विकासामुळे हळूहळू उत्पन्नाचा स्तर वाढेल. त्यामुळे वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच सरकारी कर्ज नियंत्रणाच्या प्रक्रियेत त्याची मदत होईल. वित्तीय क्षेत्राची वाढ कायम राहिल्यास पतमानांकन घटवण्याची जोखीम कमी होईल,’ असेही मुडीने नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.