मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोनबंदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोनबंदी करण्यात आली आहे. ड्रोनबंदीसंबंधी आदेश मुंबई पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) विशाल ठाकूर यांनी सोमवारी जारी केला आहे. हा आदेश १८ ऑगस्टच्या रात्रीपासून १६ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत अमलात असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे.
समाजकंटक किंवा देश विघातक वृत्ती घातपात करण्यासाठी अथवा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतात, यासाठी निर्णय घेतल्याचे पोलिसांनी आदेशात स्पष्ट केले. मुंबई पोलिसांच्या हद्दीत १८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाईट एअरक्राफ्ट, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँड ग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादीवर बंदी असणार आहे. या आदेशात मुंबई पोलिसांच्या हवाई निगराणीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन वगळण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

