शेवटची पनवेल लोकल वाशीपर्यंतच धावणार!

शेवटची पनवेल लोकल वाशीपर्यंतच धावणार!

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकावर ‘फ्रेट कॉरिडॉर’चे दोन रूळ टाकण्यासाठी उद्यापासून (ता. १९) दररोज मध्यरात्री चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक अंदाजे ४५ दिवस चालणार असून त्यामुळे हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून उशिराने सुटणाऱ्या दोन लोकल वाशी स्थानकांपर्यंत चालविण्यात येतील. तब्बल दीड महिना हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

ग्रेटर नोएडातील दादरीपासून ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी सर्वत्र रेल्वे मार्गिका टाकण्याचा प्रकल्प ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन लिमिटेड’ने हाती घेतला आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दोन नवीन रूळ पनवेल स्थानक यार्डमधून नेण्याचे नियोजित आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल येथे रेल्वे रुळांमध्ये (ईएमयू उपनगरीय स्टॅबलिंग लाईन) बदल करण्यात येणार आहे. या कामासाठी दररोज चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड-दारावे, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध होणार नाही.

असा असेल बदल...
- सीएसएमटी-पनवेल : रात्री १२.२८ आणि १२.४० (वाशीपर्यंत)
- पनवेल-सीएसएमटी : पहाटे ४.०३ आणि ४.२७ (वाशीहून अनुक्रमे ४.३३ आणि ४.५७ ला सुटणार
- सीएसएमटी-पनवेल : १२.१३ ला शेवटची लोकल
- पनवेल ते सीएसएमटी : ४.४९ ला पहिली लोकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com