रुपयाचा पाय आणखी खोलात
मुंबई : रुपयाने शुक्रवारी एक पैशांची घसरण नोंदवून अमेरिकी डॉलरसमोर ८३.१० हा नवा सार्वकालिक नीचांक नोंदवला. देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मकता आणि परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन यामुळे रुपयाचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात जात आहे. डॉलरची मजबुती आणि जागतिक बाजारात जोखीम न घेण्याची मानसिकता यामुळे रुपयामधील नकारात्मक कल कायम राहण्याचा अंदाज चलन बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.०३ वर खुला झाला. दिवसभरात ८३.०२ ते ८३.१३ या पट्ट्यात व्यवहार केल्यानंतर दिवसअखेर रुपया ८३.१० वर बंद झाला. गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत एक पैशाच्या घसरणीसह ८३.०९ वर बंद झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

