आरे तलावातील विसर्जनबंदीबाबत चर्चा

आरे तलावातील विसर्जनबंदीबाबत चर्चा
Published on

मुंबई, ता. १८ ः आरे तलावात सार्वजनिक आणि घरगुती गणपती मूर्तींच्या विसर्जनाला आरे दुग्धालय प्रशासनाने बंदी घातली आहे. त्याबाबत आरे प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी उपनगर गणेशोत्सव समन्वय समिती आणि स्थानिक आमदार लवकरच भेट घेणार आहेत.
केंद्र सरकारचा पर्यावरण जलवायू व हवामान बदल विभाग यांनी ५ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचनेनुसार आरे दुग्ध वसाहतीमधील संपूर्ण परिसर पर्यावरण व संवेदनशील क्षेत्र इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात केले असून आरे तलावात गणपती विसर्जन करता येणार नाही, असे पत्र काढले आहे. त्या पत्रामुळे घरगुती गणपती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना कुठलाही पर्याय न देता या घेतलेल्या प्रशासनाच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. अचानक विसर्जनावर बंदी आणल्यामुळे आरे तलावात गणेश विसर्जन करणारी सार्वजनिक मंडळे व घरगुती गणेशोत्सव साजरे करणाऱ्यांची अडचण होणार आहे. त्याबाबत कार्यकारी अधिकारी आरे यांच्याशी विचारविनियम करण्यासाठी मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समिती समन्वय समिती, स्थानिक आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांची संयुक्त बैठक होणार असून त्याबाबत तोडगा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विनोद घोसाळकर यांनी दिली आहे. त्याबाबत तशी मागणी एका पत्राद्वारे त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com