देसाई यांची कर्जपरतफेड २०१८ पासून मंदावली!
मुंबई, ता. १८ (पीटीआय) ः कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा वेग २०१८ पासून मंदावला होता, असा दावा एडलवाईजच्या अधिकाऱ्यांनी आज उच्च न्यायालयात केला. त्यांना कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यास आज उच्च न्यायालयाने नकार दिला.
याप्रकरणी आज एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसचे अध्यक्ष रशेश शहा व अन्य अधिकाऱ्यांतर्फे अमित देसाई यांनी आज युक्तिवाद केला. देसाई यांना १८१ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते; मात्र देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा एडलवाईजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताही हेतू नव्हता, असेही त्यांनी सांगितले. न्या. नितीन सांबरे व न्या. आर. एन. लढ्ढा यांच्यासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. आपल्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होऊ नये, अशी अधिकाऱ्यांची मागणी आहे. याप्रकरणी पुन्हा सोमवारी सुनावणी सुरू होणार आहे. यादरम्यान अधिकाऱ्यांना कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. नितीन देसाई यांनी सन २०१६ मध्ये एडलवाईजकडून दीडशे कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातून आधीची कर्जे फेडण्यात आली. २०१८ मध्ये आणखी ३८ कोटी रुपयांचे कर्ज मागण्यात आले. त्यातील ३१ कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले. २०१६ ते २०१८ दरम्यान ठरलेल्या वेळापत्रकानुसार कर्जाची परतफेड होत होती; मात्र नंतर ही परतफेड मंदावली, असेही अमित देसाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

