

खालापूर, ता. १८ (बातमीदार) : पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या गोडाऊनला शुक्रवारी (ता. १८) संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जवळपास चार तासांच्या अथक प्रयत्नानंतरदेखील आगीवर नियंत्रण मिळवण्यास २० पेक्षा अधिक अग्निशमन बंबाना यश मिळाले नव्हते.
शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कैरे गावालगत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या गोडाऊनमध्ये आगीचा भडका उडाला. गोडाऊनचा काही भाग लाकडी पॅलेटची दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला देण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅलेट असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाचे बंब खोपोली, पनवेल, रसायणी परिसरातून बोलावण्यात आले.
रसायनी पोलिस पथक, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आता बाहेर जाऊ नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या. आग लागलेल्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर कैरे गावाची लोक वस्ती आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत साधारण २० पेक्षा अधिक अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते; परंतु आगीची तीव्रता वाढली होती. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पॅलेट मालाचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.
-----------
गोडाऊनमध्ये आग लागलेला भाग स्थानिक ठेकेदाराकडे असून त्यातील काही भाग रिलायन्स कंपनी धागा तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल ठेवण्यासाठी वापर करते. प्लास्टिक दाना स्वरूपात असलेला कच्चामाल ज्वालाग्रही असून सुदैवाने हा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये यासाठी तातडीने फोर्कलिफ्टच्या साह्याने माल सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम वेगळा सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.