

मुंबई, ता. १८ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील पक्षवाढीची जबाबदारी सोपवली आहे. ३६ जिल्ह्यांतील पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी नेत्यांवर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे कळवली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांकडे लक्ष देतील. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगरकडे लक्ष देतील. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा या जिल्ह्यांची तर हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदुर्ग व अहमदनगरची जबाबदारी आहे. धनंजय मुंडे बीड, परभणी, नांदेड व जालना यावर लक्ष देतील. जय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदूरबारची जबाबदारी आहे. धर्मारावबाबा आत्राम गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात पक्षवाढीचे काम बघतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.