दर्याचा राजा लाटांना भिडणार

दर्याचा राजा लाटांना भिडणार

उरण, ता. २१ (बातमीदार)ः नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव खोल समुद्रात मासेमारीला सुरुवात करतात. यंदा शासनाने एक ऑगस्टपासून कोळी बांधवांना मासेमारीला परवानगी दिली आहे; मात्र तरीदेखील खोल समुद्रातील मासेमारी नारळी पौर्णिमेनंतरच होत असल्याने मासेमारीच्या पूर्वतयारीसाठी करंजा परिसरात कोळी बांधव तयारीला लागले आहेत.
नारळी पौणिमेपासून खोल समुद्रात मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. देवाचे नाव घेऊन खांद्यावर नवीन जाळी घेऊन बोटीवर ठेवली जातात. अशातच यंदा शासनाने १ ऑगस्टपासूनच खोल समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी दिली आहे. तरीदेखील उरण तसेच परिसरातील कोळी बांधव नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय जास्त खोल समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. त्यामुळे असलेला रिकामा वेळ जाळी विणणे, होड्यांच्या रंगकामात घालवला जात असून करंजा जेट्टी परिसरात सध्या कोळी बांधवांची हीच लगबग पाहायला मिळत आहे. तसेच नारळी पौर्णिमेला वाजतगाजत समुद्राला नारळ अर्पण करूनच खोल समुद्रात जाण्याची जय्यत तयारी सुरू आहे.
--------------------------------------------------
एक ऑगस्टला जरी शासनाने मासेमारीसाठी परवानगी दिली असली, तरी नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात नाही. त्यामुळे सध्या असलेला रिकामा वेळ नवीन जाळे विणणे, बोटी रंगवण्यात घालवला जात आहे.
- महेंद्र कोळी, मच्छीमार, करंजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com