रस्त्यांवरील धुळीने नाकीनऊ

रस्त्यांवरील धुळीने नाकीनऊ

वाशी, ता. २१ (बातमीदार)ः ठाणे-बेलापूर मार्गावर अंतर्गत रस्त्यांवर धुळीचे लोट दिसत आहेत. मान्सून काळात रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमध्ये महापालिकेच्यावतीने खडी-माती टाकून खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी हैराण झाले आहेत.
महापे-शिळफाटा रस्ता, दिघा ते पावणे एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, तुर्भे नाका ते इंदिरा नगर व एमआयडीसीत जाणारा रस्ता, ऐरोलीतील पटनी कंपनीजवळचा रस्ता, ठाणे-बेलापूर मार्ग, एमआयडीसी पट्टीतील रस्ते, तसेच औद्योगिक पट्ट्यात धुळीचे लोट उसळत आहेत. त्यामुळे एमआयडीसीतील कामगारही बेजार झाले आहेत. त्यांना दमा, खोकला, सर्दीसारखे आजार होत आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावर स्विपिंग मशिनचा वापर करण्यात येतो, पण मशिनने पूर्णपणे रस्ता साफ होत नसल्याने ठाणे-बेलापूर मार्गावर रस्त्यावरील धुळीचे लोट उसळत आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तोंडाला रुमाल लावून फिरण्याची वेळ आली आहे.
------------------------------------------
एमआयडीसीतील रबाळे येथील कंपनीत धुळीने कपडे पूर्णपणे खराब होतात. रस्त्यावरून एखादे वाहन गेल्यास नाका-तोंडात धूळ जात असल्याने तोंडाला रुमाल धरावा लागतोय.
- सचिन विनेरकर, कामगार, रबाळे
------------------------------------------
पावसाळ्यात रस्त्याने चालताना अंगावर चिखल उडत होता. आता पावसाने उसंत घेतल्यानंतर धुळीचे लोट उडत आहेत. या धुळीमुळे रस्त्याने चालताना श्वास घेणेही कठीण झाले आहे.
- किसन मिटगुले, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com